📅 महाराष्ट्र शासकीय योजना व डिजिटल माहिती पोर्टल

आपले सरकार

आपली माहिती व शासकीय योजना

परदेशात कार चालवायची? मग इथेच काढा परवाना !


सुविधा: आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकडे कल
international driving license

नोकरी, व्यवसायानिमित्त आणि फिरायला परदेशात गेल्यानंतर वाहन चालवता येत असेल तरी लायसन्स नसल्याने ते चालवता येत नाही. अशावेळी आपल्या शहरातच आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढता येते.भारतीय नागरिकांकडे स्थानिक लायसन्स असले तरी विदेशात वाहन चालवताना अडवले जाते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असते. त्यामुळे परदेशात जाणारे अनेक नागरिक हे लायसन्स काढण्यास प्राधान्य देतात. या लायसन्ससाठी कोणतीही चाचणी द्यावी लागत नाही.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढाल?

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्र घेऊन आरटीओ कार्यालयात सहायक प्रादेशिक परिहवन अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष
हजर राहावे लागते. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हे लायसन्स दिले जाते.

कागदपत्रे काय लागतात? 

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी संबंधित अर्जदाराचे लायसन्स, पासपोर्ट, व्हिसा, आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटोची आवश्यकता असते.

शुल्क किती?

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एक हजार रुपये शुल्क ₹ आहे. ऑनलाइन अर्ज करताना या शुल्काचा भरणा करावा लागतो.

एक वर्षाची मुदत
international driving license

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात यावे. सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तर अगदी सहजपणे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. या लायसन्सची एक वर्षांची मुदत असते.