📅 महाराष्ट्र शासकीय योजना व डिजिटल माहिती पोर्टल

आपले सरकार

आपली माहिती व शासकीय योजना

शेतकऱ्यांनो पीकपेरा नोंदणी केली तर होतात हे फायदे !

शेतकऱ्यांनो पीकपेरा नोंदणी केली तर होतात हे फायदे !



नैसर्गिक आपत्ती व पीकविमा भरपाईत महत्त्वाच्या असणाऱ्या ई- पीक पाहणीला  अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.आतापर्यंत खरिपात पेरणी झालेल्या एकूण क्षेत्राच्या केवळ काही टक्केच क्षेत्राची नोंद झाली आहे. त्यामुळे भरपाईसाठी आवश्यक असलेल्या या पीक पाहणीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा,
शेतातील पिकांची माहिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने ई-पीक पाहणीचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अर्थात पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करणे सोपे झाले आहे.
शेतकऱ्यांना मोबाइल अॅपवर शेतातील पिकांची नोंदणी करता येऊ लागली; परंतु या उपक्रमाला शेतकऱ्यांचा मिळावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही.



एका मोबाइलद्वारे ५० नोंदणी शक्य

 ई-पीक पाहणी करताना आता एकाच मोबाइलवरून ५० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीची नोंदणी करता येणार आहे.

ऑनलाइन नोंदणी कधीपर्यंत करता येणार? 

खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत दि. १५ ऑक्टोबर असून, जिल्ह्यातील शेतकयांनी या मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी.


नैसर्गिक आपत्तीत भरपाईसाठी आवश्यक असलेल्या या पीक पाहणीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा.

ई-पीक पाहणी न केल्यास होईल नुकसान

एखाद्या शेतकऱ्याने जर ई-पीक पाहणी नोंदणी केलेली नसेल, तर त्या संबंधित शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही; परिणामी ऐनवेळी शेतकरी अडचणीत येऊ शकतो.

ई-पीक पाहणीचे असे आहेत फायदे 

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असल्यास नुकसानभरपाई अचूक व लवकर मिळते. पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो. पीक विमा आणि पीकपाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते. ॲपवर नोंद असल्यास सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे उर्वरित खातेदारांनी दिलेल्या मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी.