नमस्कार तुमचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील एका सभेत एक आश्वासन दिलं आश्वासन काय होतं तर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर पीएम किसान pmkisan योजनेचा जो काही लाभ दिला जातो तो दिला जाईल त्यासोबतच महाराष्ट्र सरकारनं राज्य सरकारने जी काही योजना सुरू केलेली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा लाभही शेतकऱ्यांना दिला जाईल म्हणजे या दोन्ही योजनांचे ₹12000 हे शेतकऱ्यांना दिले जातील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता निवडणुकांच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकांच्या नंतर म्हणजे 20 तारखेला म्हणजे मतदान होईल त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होईल निकाल समोर येतील आणि त्यानंतर स्पष्ट होईल की राज्यात कुणाचं सरकार स्थापन होतंय पण त्याआधी पीएम किसान pmkisan योजनेबद्दल एक महत्त्वाचा अपडेट तुम्हाला मला द्यायचंय आणि तेच मी देणार आहे मुद्दा असा आहे की पीएम किसान pmkisan योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे शेतकरी पात्र असून सुद्धा वंचित आहेत अशी एक तक्रार शेतकऱ्यांकडून केली जाते ती तक्रार का केली जाते तर कुठेतरी केवायसी e kyc झालेली नसते लँड सीडिंग land seeding ज्याला म्हणतो आपण ते झालेलं नसतं त्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात पीएम किसान pmkisan योजनेतून वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे केंद्र सरकारकडून दिले जातात त्याच पद्धतीने जे या योजनेला पात्र शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना राज्य सरकार सुद्धा वर्षाकाठी सहा हजार रुपये देतं म्हणजे ₹6000 हे केंद्र सरकारचे आणि ₹6000 रुपये हे राज्य सरकारचे असे एकूण ₹12000 शेतकऱ्यांना दिले जातात अर्थात याचे तीन टप्पे दर चार महिन्याच्या अंतरानं दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आता आपण अलीकडेच बघितलं की पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याच कार्यक्रमात पीएम किसान pmkisan आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता त्यानंतर आता हा हप्ता किती होता तर हा होता दोन दोन हजार रुपयांचा म्हणजे एकुण चार हजार रुपये होते आता पीएम किसान pmkisan योजनेचा 19 वा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होईल असं शेतकरी विचारणा करत होते तर हप्ता नेमका कधी मिळेल याच्याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही कारण की अजून काही राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र असेल झारखंड असेल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका ऐन जोमात आहेत आता या निवडणुका ज्यावेळेस होतील त्यावेळेस लगेचच हप्ता दिला जाईल का तर असं नाही तर साधारणतः जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान शक्यता अशी आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वगैरे पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल याचा आपण जर का कार्यकाळ बघितला तर हा साधारणतः चार महिन्याच्या अंतरानं हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट बँक खात्यावरती dbt द्वारे जमा केले जातात आता ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी e kyc या दरम्यान करून घ्यायची आहे त्यासोबतच लँड सीडिंग land seeding करून घ्यायचंय हे सगळ्या गोष्टी केल्यानंतरही एक महत्त्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये एक दोन लाभार्थी आहेत किंवा तीन लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेतनं लाभ दिला जात नाही म्हणजे एका शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल तर दुसरी व्यक्ती पात्र ठरू शकते का म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी कुटुंबातील पती जर का यासाठी या योजनेसाठी पात्र असेल तर त्याची पत्नी या योजनेसाठी पात्र असू शकते का तर असं होऊ शकत नाही नियमानुसार असं आहे की एका कुटुंबातील एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो हे तुम्ही लक्षात ठेवा ज्या कुटुंबात एक पेक्षा अधिक हे या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचं नाव या योजनेच्या यादीतनं कमी करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या पातळीवरती सुरू झालेली आहे मग हे होत या वेळेस च हे एक महत्त्वाचं अपडेट होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आम्ही या योजनेपासून वंचित आहोत तर वंचित असण्याचं कारण एक तर तुमची ई केवायसी e kyc पूर्ण झालेली नाहीये किंवा लँड सीडिंग land seeding झालेलं नाहीये किंवा इतर तांत्रिक त्रुटी आहेत किंवा सर्वात महत्त्वाचं की तुम्ही या योजनेत पात्र नाहीयेत कारण तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत एका कुटुंबात एकच जण या योजनेसाठी पात्र ठरतो कारण की शेतकरी कुटुंब हा या योजनेचा महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे तर हे होतं महत्त्वाचा अपडेट ज्याच्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले होते की आम्हाला या योजनेचा लाभ का मिळत नाही.
मी आशा करतो की तुम्हांला सर्व बाबतीत योग्य माहिती मिळाली असेल धन्यवाद