📅 महाराष्ट्र शासकीय योजना व डिजिटल माहिती पोर्टल

आपले सरकार

आपली माहिती व शासकीय योजना

शेतकरी ओळखपत्र नोंदणी आणि फायदे

महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) नोंदणी प्रकल्पाबद्दल माहिती घेऊया. एप्रिल २०२५ मध्ये अनिवार्य करण्यात आलेला हा फार्मर आयडी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी आवश्यक आहे. आतापर्यंत सुमारे १.२९ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे आणि नोंदणीसाठी कोणतीही अंतिम मुदत नसल्याचे स्पष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही ते हमीभाव योजना, पीक कर्ज, कर्जमाफी आणि महाडीबीटी अंतर्गत मिळणारे अनुदान यांसारख्या योजनांपासून वंचित राहू शकतात. नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी किंवा इतर समस्यांसाठी शेतकरी स्थानिक कृषी किंवा महसूल अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकतात . नमस्कार मित्रांनो 15 एप्रिल 2025 रोजी शासनान एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला होता हा शासन निर्णय काय होता तर राज्यात शेतकऱ्यांसाठी 15 एप्रिल 2025 पासून शेतकरी फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी नोंदणी क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी नोंदणी क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे परंतु आत्तापर्यंत या योजनेमध्ये या प्रकल्पामध्ये किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाहीये त्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनांपासून वंचित राहावं लागू शकतं आणि त्यासोबतच या योजनेसाठी किंवा या प्रकल्पा अंतर्गत कोणत्या तारखेपर्यंत शेतकरी नोंदणी करू शकतात असे विविध प्रश्न आम्हाला शेतकऱ्यांकडून विचारण्यात आलेले होते आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज समजून घेणार आहोत ,आत्तापर्यंत म्हणजेच 30 मे 2025 पर्यंत कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 30 मे 2025 पर्यंत या योजनेत जवळपास 1 कोटी 29,737 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जवळपास एक कोटी 71 लाख 97 हजार शेतकरी आहेत जे एग्रीस्टॅक नोंदणीमध्ये स्वतः शेतकरी नोंदणी करून फार्मर आयडी हे मिळवू शकतात परंतु आतापर्यंत एक कोटी 29 हजार 737 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये फार्मर आयडी साठी अप्रूव्ल जे काही दिलेला आहे ते कृषी विभागाने आत्तापर्यंत एक कोटी 29 लाख429 शेतकऱ्यांना दिलेल आहे म्हणजे एक कोटी 29 लाख 429 शेतकऱ्यांना त्यांचा शेतकरी क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आता या पद्धतीचे जे काही शेतकरी फार्मर आयडी जे काही आहेत ते डाऊनलोड करण्यासाठी सुद्धा सुरुवात सुद्धा केलेली आहे अशी सुद्धा कृषी विभागाने माहिती दिलेली आहे खरं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो शेतकऱ्यांकडून विचारला जात होता की ऍग्रीस्टॅक या नोंदणीसाठीची नेमकी शेवटची तारीख कोणती आहे तर यासाठी अद्यापही कुठलीही शेवटची तारीख नाहीये असं कृषी विभागाने स्पष्ट केलेल आहे आता बरेच शेतकरी असही म्हणतील की आम्ही शेतकरी ओळख क्रमांक काढलं नाही तर नेमकं काय होणार तर सर्वात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही हमीभाव योजनेपासून वंचित राहू शकता त्यासोबतच तुम्हाला पीक कर्ज घेता येणार नाही त्यासोबतच जर का पीक कर्जाची परत फेड असेल किंवा कर्जमाफी असेल तर ती करताना ती घेताना सुद्धा तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्यासोबतच महाडीबीटीच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांसाठी हा जो काही शेतकरी ओळख क्रमांक आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्या लाभापासून वंचित राहू शकतात आता खरीप हंगाम तोंडावरती आलेला आहे आणि त्यामुळे प्रमाणित बियाणे यासाठी 100% अनुदान हे दिलं जातय राज्य सरकारकडून आणि त्या त्याची जी काही अंमल बजावणी आहे ती महाडीबीटीच्या अंतर्गत केली जाते परंतु ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाहीये त्यांना हे अनुदानित बियाणं मिळणार नाही किंवा घेता येणार नाही त्यासाठी ते शेतकरी पात्र असणार नाहीयेत शेतकऱ्यांना या योजनेपासून या लाभापासून जर का वंचित राहायचं नसेल तर शेतकऱ्यांनी तातडीन हे ऍग्रीस्टॅक वरन नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक मिळवणं महत्त्वाचं आहे आपण ते कसं मिळवायचं शेतकऱ्यांनी मोबाईलवरूनच यावरती एक लेख लिहिलेला आहे ते पाहून तुम्ही नोंदणी करू शकता दुसरीकडे शेतकऱ्यांचा एक असा सुद्धा मुद्दा आहे की ज्यावेळेस आम्ही शेतकरी म्हणून नोंदणी करण्यासाठी एग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरती जातो त्यावेळेस आम्हाला अनेक प्रकारचे अडचणी आणि समस्या ह्या उद्भवतात त्यामध्ये बऱ्याचदा तर ही वेबसाईट बंद असते त्यामुळे तिथे लॉगिन करताना अडचणी येतात आणि रजिस्ट्रेशनही होत नाही तर अशा वेळेस शेतकरी एक तर आपल्याला माहिती आहे की स्वतः नोंदणी करू शकतात किंवा सीएससी सेंटरवरून सुद्धा याची नोंदणी करता येऊ शकते परंतु जर दोन्ही बाजू दोन्ही ठिकाणी जर का नोंदणी करताना अडचणी आल्या तर महसूल किंवा कृषी विभागाच्या स्थानिक पातळीवरती जी काही अधिकारी आहेत त्यांच्याशी भेटून तुम्ही या प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दलची त्यांना माहिती द्या ते तुम्हाला मदत करतील असंही कृषी विभागाने सांगितलेल आहे नमो सन्मान निधी आणि पीएम किसानचा हप्ता हा जूनमध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामुळं जर शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक जर का काढलेला नसेल तर शेतकऱ्यांना जूनचा जो काही पीएम किसानचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जो आहे त्यापासून वंचित राहावं लागू शकतं त्यासोबतच महाडीबीटीच्या ज्या काही योजना आहेत त्याचा सुद्धा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही त्यामुळे कृषी विभागाने सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान केलंय की तुम्ही आतापर्यंत जर का शेतकरी ओळख क्रमांकसाठी अर्ज केलेला नसेल नोंदणी केलेली नसेल तर लगेच ताबडतोब नोंदणी करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कुठल्याही योजनांचा लाभ हा चुकणार नाही तर माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर नक्की करा. शेतकरी ओळखपत्र नोंदणीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) १. शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) नोंदणी करणे का अनिवार्य आहे? राज्यातील शेतकऱ्यांसाठी १५ एप्रिल २०२५ पासून शेतकरी फार्मर आयडी, म्हणजेच शेतकरी नोंदणी क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी हा नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे. २. शेतकरी ओळखपत्र नोंदणीसाठी अंतिम तारीख कोणती आहे? कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप शेतकरी ओळखपत्र नोंदणीसाठी कोणतीही अंतिम तारीख निश्चित केलेली नाही. ३. शेतकरी ओळखपत्र नोंदणी न केल्यास कोणत्या योजनांपासून वंचित राहावे लागू शकते? शेतकरी ओळखपत्र नोंदणी न केल्यास हमीभाव योजना, पीक कर्ज घेणे, कर्जमाफी, महाडीबीटीच्या योजना, आणि खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाण्यांवरील अनुदान यांसारख्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागू शकते. तसेच, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळण्यातही अडचणी येऊ शकतात. ४. ३० मे २०२५ पर्यंत किती शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे? ३० मे २०२५ पर्यंत कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ कोटी २९ लाख ७३७ शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली आहे. त्यापैकी १ कोटी २९ लाख ४२९ शेतकऱ्यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक मंजूर झाला आहे. ५. शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रिया कशी करावी? शेतकरी स्वतःहून मोबाईलवरून ऍग्रीस्टॅक वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. या प्रक्रियेची माहिती देणारा व्हिडिओ उपलब्ध आहे. तसेच, CSC सेंटरच्या माध्यमातूनही नोंदणी करता येते. ६. ऍग्रीस्टॅक वेबसाइटवर नोंदणी करताना काही समस्या आल्यास काय करावे? ऍग्रीस्टॅक वेबसाइटवर नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्यास किंवा वेबसाइट बंद असल्यास, महसूल किंवा कृषी विभागाच्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्यांबद्दल माहिती द्यावी. ते तुम्हाला मदत करतील. ७. नमो सन्मान निधी आणि पीएम किसानचा हप्ता मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे का? होय, नमो सन्मान निधी आणि पीएम किसानचा हप्ता मिळण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक आहे. जूनमध्ये वितरित होणारा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करणे आवश्यक आहे. ८. शेतकरी ओळखपत्र नोंदणीमुळे महाडीबीटीच्या योजनांचा लाभ कसा मिळतो? महाडीबीटीच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.